Saturday, October 3, 2009

समांतर !

नुकताच अमोल पालेकर चा समांतर सिनेमा पाहिला. प्रिय व्यक्तीचा विरह हा विषय नवीन नसला तरी तो हाताळताना एक विलक्षण संवेदनशीलता जोपासली आहे. दोघांचा अभिनय तर सुंदर च पण शर्मिला टागोर चा बराचसा मूक अभिनय फारच बोलका वाटतो. प्रेमाचं माणूस बरोबर सोबत नसलं तरी त्या विषयी च्या कोमल, हळूवार भावना या कुठ्ल्याही सुंदर गोष्टीतून, कलेतून व्यक्त होत राहतात आणि खरं प्रेम हे कधीच destructive नसतं तर ते सृजनशील असतं याची साक्ष मिळत राहते. मग ते व्हायोलीन चे खेचणारे सूर असोत किंवा सुंदर काव्य असोत, अथवा ओरिगामी चे पक्षी असोत, खूप जपलेली बकुळीची फुलं असोत वा चित्रकलेतून, कुंभारकलेतून साकारणारे कल्पक आकार असोत. मनस्वीपण, उत्कटता, अथांग प्रेम ज्याला समजतं आणि पेलवतं त्याला या सिनेमाचं सौंदर्य ही उमगेल !

2 comments:

  1. amazing....simply amazing...Sanik, I knew you write well...but this is amazing. you are awesome dear! keep writing...

    ReplyDelete
  2. BABA SAID IT
    EAK ENGINEER VA EAK VANGMAY ASLELI AAI CHE GUNE GHEUNE AALELI TO MULAGI.
    KEEP IT UP
    BABA.

    ReplyDelete