Thursday, October 15, 2009
’तू’ !
’तू’ भेटायला येणार म्हणून तयारी चालू आहे. एकीकडे उत्सू्कता आहे, अधीरता आहे तर थोडी धाकधूक ही आहे. तसे आता बरेच दिवस झाले भेटू भेटू म्हणतोय आपण पण कशी असेल प्रत्यक्ष पहिली भेट असं वाटून कधी शहारणं तर कधी मोहरणं चालू आहे. प्रत्येक नातं नवीन काय काय घेऊन येतं. प्रेम अनेकदा सापडतं आणि वेगवेगळ्या छटा उलगडून दाखवतं. त्याची तुलना करू नाही कारण ती होवू शकत नाही. समोरच्याला आहे तसं स्विकारणं म्हणजे च प्रेम ना? तुझं ’तू’ असणं आणि ते मला मनापासून आवडणं म्हणजे च प्रेम ना? ’तू’ कसं असावंस, कसं दिसावंस, कसं रहावंस, कसं वागावंस, काय करावंस आणि कसं जगावंस हे मी ठरवणं म्हणजे ’तू’ला मी बांधून ठेवणं, ’तू’झ्यातल्या नैसर्गिक शक्तिला, भक्तिला, अभिव्यक्तिला सहजच आडवं येणं. तुझं मन मोडून जर काही माझ्या मनासारखं होत असेल तर तो ’तू’ मला दिलेला आनंद नसून केवळ माझा ’स्व’ सुखावणं नाही का? म्हणूनच मनापासून वाटतं - तुझं माझं नातं अगदी भेटीच्या पहिल्या क्षणापासून मुक्तं असावं, अपेक्षा नसाव्या, मानसिक अवलंबित्व नसावं, ’स्व’ सुखावण्याचा खोटा खेळ नसावा, दोन जीवांचं भेटणं असावं पण दोन व्यक्तिमत्वांचं भिडणं नसावं, कोणी एकानेच न खेचता जगणं म्हणजे एकमेकांकडून अलगद शिकत जाणं असावं, मी म्हणेन तसंच कर असा आग्रह नसावा, आणि ’तू’ आणि ’मी’ साथीने पण स्वतंत्र आपापल्या गतीनं, मतीनं, शक्तिनं आणि श्रध्देनं वाढत रहाणं असावं, जगण्यातल्या आव्हानांशी झगडत घडत जाणं असावं !
Subscribe to:
Post Comments (Atom)
Sundar! it is hard to separate u from the writer but still as an independent script it is beautiful!A must to experience i say!
ReplyDeletegood
ReplyDeleteGOOD
ReplyDeletekhup cchan ani agadi khara..
ReplyDeletetula tuzya 'tu' chya sukhakar aagamanasathi manapasun shubheccha!
-Irawati.
Hi chanach lihiles.'TU' wishayi tu agadi manapasun lihles.ekunach tuze wicchar waachtana jeevana kade pahnyacha ek weglya paddhatine nemakepana janawato.aslelya wa nawya natya baddal manat kalpana spashta ahet.ani tya tu swtaha tari nakkich amlat anshil. 'TU' pan tula sath deil ashi iccha kerte.kalachya pudhech 2 steps ahes tyasathi apan adhi swata kay ahot hyache purna chitra manat asawe lagte.tase tuze ahe.ek nishccit wichar tya pathimage ahe ase janawate.
ReplyDeletekhuup chan ani khuuup kharahi....
ReplyDeleteMast
ReplyDelete