चिमुरडी च्या हातातल्या हारापेक्षा
तिच्या डोळ्यातली निरागसता खूप मोलाची वाटते.
मंदिर गजबजले की तिच्या चेहऱ्यावरून
हेलावत जातात आनंदाचे घंटानाद
फुलांच्या ह्र्दयातून पांढरा दोरा सरकत जातो
गुंफलेल्या हिरव्या पानात उमलते संध्याकाळ्चे गहिरे गाणे
श्रध्देवर गडद होत जाते
तिच्या करूणार्त नजरेने ओंजळल्या प्राणाचे आवरण
स्वप्नांना नसतो कशाचाच अडसर
अलगद उतरतात ती मनाच्या कप्प्यातून डोळ्यात
पाहता पाहता भिरभिरत जातात दशदिशात
ओलसर निःशब्द पिंडीवरती हार वाहताना
आम्ही नव्हतोच तिथे, होते तिचे हात !
No comments:
Post a Comment